अडीच वर्षात लोकांची कामे झालीच नाहीत, शिंदे गटातील नवनियुक्त युवा सेना पदाधिकाऱ्याचा आरोप
अमजद खान। कल्याण: गेल्या अडीच वर्षात युवा सेनेच्या मार्फत लोकांची कामे झालीच नाही असे धक्कादायक विधान शिंदे गटातील नवनियुक्त युवा सेना कार्यकारीणीमधील सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार आणि लोकांची कामे मार्गी लावणार असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आपआपल्या परीने कार्यकारीणी जाहिर केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर आज शिंदे गटाने युवा सेनेची कार्यकारीणी जाहिर केली आहे. 2क् सदस्याच्या या कार्यकारीणीत डोंबिवलीचे दिपेश म्हात्रे यांचा समावेश आहे. दिपेश म्हात्रे यांना ठाणो, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली.
कार्यकारीणीच्या घोषणोनंतर दिपेश म्हात्रे यांनी सांगितेल की, युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे मला पद दिले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा यात खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्र भर काम करण्यासाठी युवा सेना वाढविण्यासाठी हे पद मला दिलेले आहे. गेल्या अडीच वर्षात कामे झाली नाहीत. ती कामे करण्यासाठी हे पद दिलेले आहे. महाराष्ट्र भर फिरून युवाना जोडण्याचे आणि युवांची समस्या मुख्यमंत्र्यांर्पयत पोहचविण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रातील युवाना न्याय देण्याचे काम करणार आहे.