Covid Center : मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर आता होणार बंद

Covid Center : मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर आता होणार बंद

कोरोनाने जगभरात अक्षरक्ष: हाहाकार माजवला होता. काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते तर काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असताना सध्या रुग्ण सापडत आहेत. परंतु रुग्णांमध्ये लक्षणं असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मुंबईतील सातही जम्बो कोविड (jumbo covid ) सेंटर बंदसाठी आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहेरुग्णच नसल्यानं हजारो बेड रिकामे आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाने जगभरात अक्षरक्ष: हाहाकार माजवला होता. काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते तर काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असताना सध्या रुग्ण सापडत आहेत. परंतु रुग्णांमध्ये लक्षणं असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मुंबईतील सातही जम्बो कोविड (jumbo covid ) सेंटर बंदसाठी आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहेरुग्णच नसल्यानं हजारो बेड रिकामे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची कार्यवाही सुरु केली आहे. राज्यात कोविड लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे. लसीकरणाच्या दैनंदीन प्रमाणात दुपटीनं वाढ झाली आहे. बुस्टर डोस घेण्याचं प्रमाणही वाढले आहे.

दहा जम्बो कोविड सेंटरची बेडसंख्या एकूण

दहिसर चेकनाका, कांदरपाडा 700 बेड (बंद)

मालाड जम्बो कोविड सेंटर 2200 बेड

नेस्को गोरेगाव फेज-1 – 2221 बेड (बंद)

नेस्को गोरगाव फेज-2- 1500 बेड (बंद)

बीकेसी कोविड सेंटर- 2328 बेड

कांजुरमार्ग कोविड सेंटर- २००० बेड (बंद)

शीव जम्बो कोविड सेंटर- 1500 बेड

आरसी भायखळा सेंटर- 1000 बेड

आरसी मुलुंड जम्बो सेंटर- 1708 बेड

सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी- 1850 बेड

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या नियोजनबद्ध कामामुळे तीन लाटा यशस्वीपणे परतवून लावण्यात प्रशासनाला यश आले. मे महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने दिवसाची रुग्णसंख्या अडीच हजारांपार गेल्याने वाढलेले टेन्शन रुग्णसंख्या 200 ते 250 वर आल्याने पुन्हा एकदा कमी आले झाले आहे

Covid Center : मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर आता होणार बंद
'या' देशात होणार Asia Cup; BCCI प्रमुख सौरव गांगुली यांची मोठी घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com