'या' गंभीर कारणामुळे दिल्लीतील सर्व शाळा दोन दिवस बंद! मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व शाळा बंद असणार आहे. सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळा पुढील 2 दिवस बंद राहणार आहेत. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं की, "वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळा पुढील 2 दिवस बंद राहतील. प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे. लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.
गुरुवारी दिल्लीतील अनेक भागात हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली. यापैकी पंजाबी बागेत AQI 439, द्वारका सेक्टर-8 मध्ये 420, जहांगीरपुरीमध्ये 403, रोहिणीमध्ये 422, नरेलामध्ये 422, वजीरपूरमध्ये 406, बवानामध्ये 432, मुंडकामध्ये 439, आनंद विहारमध्ये 452 आणि आनंद विहारमध्ये 452 अशी नोंद करण्यात आली आहे.