Al Qaeda
Al QaedaTeam Lokshahi

अल कायदाकडून भारतात सुसाईड बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी

Nupur Sharma यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अल कायदाकडून निषेध
Published on

नवी दिल्ली : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद सुरूच आहे. आता या वक्तव्याचा अल कायदा (al qaeda) या आतंकवादी संघटनेने निषेध केला आहे. तर, मुख्य शहरांमध्ये सुसाईड बॉम्बस्फोट (Suicide Bombing Attack) घडवून आणण्याची धमकीही दिली आहे.

Al Qaeda
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांची आज तोफ धडाडणार; निशाण्यावर कोण?

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यांचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येतो आहे. याचा इस्लामिक देशांकडूनही निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच आता आतंकवादी संघटनेना अल कायदानेही मोहम्मद प्रेषित यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. तसेच, सुसाईड बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. यासंदर्भात अल कायदाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात दिल्ली, मुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये सुसाईड बॉम्ब घडवून आणू, अशी धमकी देण्यात आली आहे.

तर, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांसह आरएसएसच्या इतर पाच कार्यालयांना बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ही धमकी देण्यात आली होती.

Al Qaeda
Uddhav Thackeray : सभेआधी औरंगाबादकरांसाठी राज्य सरकारकडून खैरात

दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मावर कारवाई करताना पक्षाने त्यांना निलंबित केले आहे तर दुसरीकडे नवीन जिंदाल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. व ते सर्व धर्मांचा आदर करतात, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

नूपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबई तसेच, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली असून २२ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com