Amol Mitkari: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; अमोल मिटकरी म्हणाले...

Amol Mitkari: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; अमोल मिटकरी म्हणाले...

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल नांदूरकर, अकोला

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तळोजा जेलमध्ये पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले.

त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली.

याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, बदलापूरचा आरोपी हा विकृत होता. दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या होत्या. एका पत्नीचं स्टेटमेंटही त्याबद्दल आलं आहे. त्याने ज्या पद्धतीने ते दुष्कृत्य केलं त्याबद्दल उद्रेक झाला आणि त्याच्यामुळे आज ज्यावेळेस त्याला तळोजा जेलमध्ये आणण्यात येत होते त्यावेळेस त्याने पोलिसांवरच फायरिंग केली. एक एपीआय मोरे त्यात जखमी आहेत. आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला असेल तर मला असं वाटतं निसर्गाने त्या चिमुरड्यांना न्याय दिलाय. या प्रकरणाचा न्याय झाला. असे अमोल मिटकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com