ताज्या बातम्या
अकोल्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट; महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
अकोल्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती मिळत आहे.
अमोल नांदूरकर, अकोला
अकोल्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती मिळत आहे. महिलांकडून तलाठी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे. महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत. या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे.
अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी आहेय. या दरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याची माहिती मिळत आहे.