Akbaruddin Owaisi
Akbaruddin OwaisiTeam Lokshahi

"एकाच धर्माच्या प्रगतीने देश महासत्ता होईल असा विचार करणारे मूर्ख"

औरंगाबादेत ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंसच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.
Published on

औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहबाद्दुल मुस्लमीनचे (AIMIM) नेते आणि हैदराबादचे (Hyderabad) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) हे आज औरंगाबादेत आहेत. ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंसच्या उद्घाटनासाठी ते औरंगाबादेत (Aurangabad) आले होते. अकबरुद्दीन ओवैसी यांनी उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी ते देशातील सध्यस्थितीवर बोलताना म्हणाले की, देश हा कोणत्याही एका धर्मापासून बनत नाही. हिंदु, मुस्लीम, शीख, जैन, बौद्ध या सर्वांपासून देश तयार होतो असं ते यावेळी म्हणाले. देशातील सर्व धर्म सोबत पुढे गेले तर देश सुपर पॉवर होईल. कोणी दिवाना जर विचार करत असेल की कुणा एका धर्माच्या प्रगतीनं पुढे जाईल, तर ते मुर्ख आहेत.

Akbaruddin Owaisi
शिवरायांचा पुतळा हटवण्यावरुन वाद; जालन्यात दगडफेकीनंतर पोलिसांकडून गोळीबार

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, कोणताही देश तोपर्यंत विकसीत होत नाही, जोपर्यंत तिथल्या प्रत्येक नागरिकाला तो देश आपला वाटत नाही. आपण आज या शाळेच्या भुमिपुजनाच्या माध्यमातून मी मुस्लीम विद्यार्थ्यांना देशाच्या जडनघडणीतला एक महत्वाचा भाग बनवायला आलो आहे. यावेळी ते पुढे असेही म्हणाले की, कोणी मुर्ख जर असा विचार करत असेल की, कुणा एकाच्या विकासानं हा देश महासत्ता होईल, तर ते मुर्ख आहेत. आम्ही आमचा हा विचार घेऊन पुढे जातो आहोत. शिक्षणाच्या बाबतीत मुस्लीम मागे आहेत हे मान्य करावं लागेल. ही शिक्षण संस्था जरी मुस्लीम वस्तीत असेल तरी, इथे कुणी हिंदुंसाठीही आमच्या या शाळेचे दरवाजे उघडे असतील असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. तुमच्या मनात तरी आमच्याबद्द द्वेष असेल तरी आमचं मन मोठं आहे असं अकबरुद्दीन म्हणाले. आमचं मन कायम मोठं होतं, त्यामुळे जग अकबर आणि बाबरची आठवण करतं.

Akbaruddin Owaisi
Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी फडणवीस मध्यस्ती करतील - मुनगंटीवार

दरम्यान, अकबरुद्दीन ओवैसी यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाल्याचं समोर आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com