'अजित पवार बारामतीतूनच विधानसभा लढणार' अमोल मिटकरींच वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी ही बारामतीकरांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उंचावलेली प्रतिमा या गोष्टी आमचे विरोधक जाणून आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक मोरल डॅमज करण्यासाठी केवळ विरोधकांकडून पिकवलेल्या चर्चा असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं आहे. अजित दादा बारामती सोडणार नाहीत असा दावाही आमदार मिटकरी यांनी केला. दादांनी बारामतीतून लढावं ही बारामती करांची इच्छा असल्याचं ते म्हणाले.
तर लोकसभेत झालेला पराभव जरी वेदनादायक असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीकर भरभरून साथ देतील असा दावाही आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. केवळ विरोधकांकडून चर्चा पेरण्याचे काम केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांची थोबाड विधानसभा निवडणुकीत बंद होतील असेही मिटकरी म्हणाले.