शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार नाराज?

शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार नाराज?

शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील निवडणुकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळेंवर देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे तर प्रफुल पटेल यांच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही आहे. या घोषणेनंतर आता अजित पवार आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे. अजित पवारांनी या घोषणेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com