अजितदादा मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच; 'या' आमदारानं केला दावा

अजितदादा मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच; 'या' आमदारानं केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्ट देखिल केलं की, मी राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. मात्र, एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आणि पुन्हा या चर्चा रंगू लागल्या.

यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना आहे. माझीही तीच भावना आहे.अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा ही प्रत्येकाची भावना आहे. असे मिटकरी म्हणाले.

तसेच अजित दादा मुख्यमंत्री होणार आहेत. वेट अँड वॉच. दिल्लीतून सूत्र हलत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणार. अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री होणार आहेत. असे अमोल मिटकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com