"PM मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान"
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू दौऱ्याकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान आज देहूमध्ये दाखल झाले, त्यानंतर त्यांनी शिळा मंदिराचं लोकार्पण करुन उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या कार्यक्रमासाठी राज्याच्या वतीने अजित पवार देखील उपस्थित होते. प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या वतीने अजित पवार यांना भाषणासाठी संधी देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषण करु दिलं नाही ही दडपशाही असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "प्रोटोकॉल प्रमाणे अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला पाहिजे होती. अजित पवारांच्या कार्यालयातुन विनंती केली होती, की अजित पवारांना भाषण करू द्यायचे आहे पण त्यांना भाषन करू दिले नाही. अजित पवारांना भाषण न करू देने हे अतिशय वेदना देणारं आहे. अजित पवारांना भाषणाला पंतप्रधान कार्यालयातुन नकार आला, हे मला वेदना देणारं आहे. महाराष्ट्र राज्याचा हा अपमान आमच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषण न करू देणं हे धक्कादायक आहे."
अजित पवारांना भाषण करून देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशाही प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत, मात्र देहू संस्थान कडून जे स्पष्टीकरण देण्यात आला आहे. त्यानुसार प्रोटॉकल नुसार प्रस्तावना तयार करण्यात आली होती. आणि त्यामध्ये अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख कुठेही नव्हता असेही सांगण्यात आले. मात्र पालक मंत्री असलेल्या अजित पवारांनी कार्यक्रमांमध्ये भाषण का केलं नाही याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी भाषणामध्ये राज्यपाल यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याचमुळे अजित पवारांना भाषण करू दिले नाही का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो.