प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीच कारण...
विधानसभा निवडणुकअवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, जाहीरनामे प्रसिद्ध होत आहे. यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्याच्या या भेटीच कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्यांच्या या भेटीमुळे अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि ते ९ तारखेपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, अशी माहिती अजित पवारांना दिली आहे.
आमच्या इतर काही गप्पा झाल्या नाही. या गप्पा अर्ज माघारी घेण्याआधी होण्याची शक्यता असते.पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती.