Ajit Pawar ; अजित पवारांनी मांडलं सरकारच्या कामाचा लेखाजोखा ‘रिपोर्टकार्ड’

Ajit Pawar ; अजित पवारांनी मांडलं सरकारच्या कामाचा लेखाजोखा ‘रिपोर्टकार्ड’

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
Published by :
shweta walge
Published on

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत लाडकी बहीण योजना अन् सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर केलं आहे.

अजित पवार म्हणाले, मेजर गोष्टी रिपोर्टकार्डमध्ये आहे. क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही समाविष्ट केल्या आहेत. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत. आम्ही जनतेचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणालेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com