Ajit Pawar on Baba Siddique Death : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी घटना असल्याचं म्हणत अजित पवारांनी यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.
अजित पवारांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे.…
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रावादी प्रवेश केला होता. जवळपास 48 वर्ष काँग्रेसमध्ये काम करुन बाबा सिद्दीकी यांनी हाती घड्याळ घेतलं होतं. पण दसऱ्याच्या दिवशी (दि.12) रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.