अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, भेटीमागचं मोठं कारण समोर

अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, भेटीमागचं मोठं कारण समोर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार,प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ पोहचले आहेत.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार,प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ पोहचले आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण यंदाची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू नका अशी विनंती करण्या करिता हे नेतेमंडळी आज नवाब मलिक यांच्या भेटीला आले असल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिक यांच्या घरी अजित पवार,प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे या बैठकीत नवाब मलिक यांना इतर नेत्यांकडून निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात आली पण नवाब मलिक हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर या विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकिट जाहीर झाल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com