Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; " राज्यात महिलांचा मोठा वर्ग आर्थिक बाबतीत..."
Ajit Pawar Birthday : यंदाचा अर्थसंकल्प मी सादर केला. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेनं आणि विधिमंडळाच्या आमदारांनी ऐकलं. त्या बजेटमध्ये मी ठरवलं होतं की, गरिब वर्गासाठी आणि विकास करण्यासाठी अधिक लक्ष द्यायचं. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीने पुढे जायचं ठरवलं. शीव शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मी आतापर्यंत दहावेळा सादर केला. फार मोठ्या थोर महिला आपल्या राज्याला मिळाल्या. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई अशा कितीतरी महिलांची नावं घेता येतील. पण आज राज्यात महिलांचा फार मोठा वर्ग आर्थिक बाबतीत तेव्हढा सक्षम नाही. त्यांना मला सक्षम करायचं होतं. म्हणून मी या अर्थसंकल्पात महत्त्वाची योजना देण्याचा प्रयत्न केला. माझी लाडकी बहीण योजना सुरु केली, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत केलं.
जनतेला संबोधीत करताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या संख्येत महिला या योजनेचं स्वागत करत आहेत. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पुढं जायचं ठरवलं आहे. अडीच कोटी महिलांना ४५ हजार कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी द्यायचं ठरवलं. जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात झाली आहे. अडचणी येत आहे. अॅपवर ५ ते ७ लाख लाभार्थी अर्ज भरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज येत असल्यानं काही अडचणीत येत आहेत. त्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जात आहेत. अर्ज भरत असताना काही चुकलं कर, संपूर्ण अर्ज भरण्यासाठी एकदा मुभा दिली आहे.
ज्यांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे, त्या माय माऊलींना हे पैसे मिळाले पाहिजेत. पैसे त्यांच्या खात्यात थेट जमा झाले पाहिजेत. बँकेचं खातंही तुम्हाला आम्ही उघडून देणार आहे. त्यामध्ये आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे. मंत्रालयात थेट पैसे खात्यात जमा केले की ते पैसे तुमच्या खात्यात पोहोचणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा खाते क्रमांक आम्हाला लागणार आहे. माझ्या माय माऊलींना हक्काचं मानधन कसं देता येईल, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.