NCP Manifesto : लोकसभेसाठी 'NCP'चा जाहीरनामा सादर, अजित पवार म्हणाले, "राष्ट्रासाठी राष्ट्रवादी..."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसीत भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधा प्रकल्पांसह आर्थिक प्रगतीचे संकप्लाचाही यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे. दिलीप वळसे पाटील पुण्यात उपचार घेत आहेत. तरीही त्यांनी हा जाहीरनामा करत असताना या समितीला सतत मार्गदर्शन केलं. त्यांनी एक चांगला जाहीरानामा पक्षासाठी तयार केला आहे. त्याबद्दल त्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यावेळी काँग्रसेचे नेते मुश्ताक अंतुले यांनी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार पुढे म्हणाले, राज्यातल्या सर्व समाज घटकांना म्हणजेच बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा, देशाच्या आणि राज्याच्या विकास प्रकियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. ग्रामविकासात आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगाराचा मुद्दा आहे. २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रित निवडणुकीत महायुतीचे घटक म्हणून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्तात या निवडणुका लढवत आहोत. मोदींच्या नेतृत्वात आपला विजय निश्चित आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊन मत मागत आहोत. एनडीएचा आत्मविश्वासू चेहरा म्हणून मोदींना पाहिलं जातं. मोदी देशातले सक्षम नेतृत्व आहेत.
त्यांच्याबद्दल देशवासीयांच्या मनात आपुलकी, प्रेम, श्रद्धा आणि अपार विश्वास आहे. विरोधी पक्षात असा एकही चेहरा पाहायला मिळत नाही. जो मोदींच्या समोर उभा राहून स्पर्धा करु शकेल. पहिल्या टप्प्यातील मतदान झालं, ते टक्केवारीत कमी झालं आहे. त्याला काही कारणं आहेत. प्रचंड उष्णता होती आणि कार्यकर्त्यांना बुथबाबत माहिती देण्यात आली होती. पण काही लोकांची बुथ केंद्रावर नावच नव्हत. त्याचाही फटका या मतदानाला बसला. असं काही पुढे होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष करतील, सर्वांनाचा वाटतं की जास्तीत जास्त मतदान व्हावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे, तो भारताच्या प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार
यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावा
शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थितपणे असली पाहिजे.
अपारंपारिक वीज निर्मितीला प्राधान्य देणार
कृषीपीक विम्याला व्याप्तीत वाढ
शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ
मुद्रा योजना कर्जात मर्यादीत वाढ
जातनिहाय जनगणना करणे
उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा.
वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावे यासाठी योजना
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं, यासाठी पाठिंबा