अजित पवारांच्या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे अडचणीत

अजित पवारांच्या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे अडचणीत

Published by :
Jitendra Zavar
Published on

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याची चौकशी आता सुरु झाली. या प्रकरणात मुंबई पोलीसांचं अपयश (Mumbai Police).समोर येत आहे. एस.टी. आंदोलक हे पवारांच्या घराकडे चाल करुन गेले, ते मीडियाला कळालं पण मुंबई पोलिसांना कसं काय नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. सोशल मीडियावर सुरु असलेला हा सवाल आता अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडे असलेले गृहखातेच यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे ही अडचणीत आले आहे.

अजित पवारांच्या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे अडचणीत
रात्रभर पोलिस आक्रमक : पवारांच्या घरावर हल्ला ते सदावर्तेंना अटक अन् आझाद मैदानावर कारवाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या आंदोलनाच्या वेळी पवार यांचे निवासस्थान असलेले 'सिल्व्हर ओकवर मीडिया आंदोलकांसह पोहोचली. परंतु पोलीसांना त्याची माहिती मिळाली नाही. पोलीस दलात वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचे काम सुरु असते. त्यासाठी त्यांच्यांकडे गुप्तवार्ता विभागही असतो. यामुळे या प्रकरणात पोलिस दल कमी पडल्याचे निर्वादित सत्य आहे' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मीपोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

अजित पवारांच्या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे अडचणीत
Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलक मद्यधुंद | VIDEO

अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यावेली प्रसार माध्यमांशी बोलत असताना सिल्व्हर ओकवर झालेल्या गोंधळाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, 'दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर आझाद मैदानावर गुलाल उधळला आणि मिठाई वाटली गेली. त्यांना खूप मोठं यश मिळालं असं दाखवण्यात आलं. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचे काहीच कारण नव्हते. त्यावेळी एकाने तिथे भाषण केलं होतं की १२ तारखेला बारामतीला जाणार आहे. याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे, पोलीस दलात वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचे काम असतं, त्याच्यामध्ये ती लोक कुठे तरी कमी पडली. हे निर्वादीत सत्य आहे'.

अजित पवारांच्या वक्तव्याने गृहमंत्री दिलीप वळसे अडचणीत
तारा सुतारीयाचा हॉट अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

मीडिया पोहचली पण यंत्रणा का नाही

'ती लोक सिल्व्हर ओकवर पोहोचली तेव्हा मीडियाची माणसं कॅमेरा घेऊन पोहोचली होती. मीडियाची माणसं तिथे येते तेव्हा त्यांना आधी माहिती असते. मीडियाचे काम होते की त्यांना आधी माहिती मिळाली तर ती दाखवणे. जर मीडियाने हे शोधून काढले तर मग संबंधीत यंत्रणेला का नाही शोधता आले नाही?' असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

वळसे पाटलांची अडचण?

आघाडी सरकारमध्ये सर्वात महत्वाचे असलेले गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. त्याचे नेतृत्व दिलीप वळसे पाटील करत आहे. परंतु गृहखाते वादांच्या केंद्रस्थानी आलं आहे. सचिन वाझेंचं अँटेलिया प्रकरण, अनिल देशमुखांना गंभीर आरोप, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांचे शंभर कोटीचे आरोप, यावरुन गृहखाते चर्चेत आहे. आता तर खुद्द शरद पवारांच्याच घरावर एस.टी.आंदोलक चाल करुन गेले आणि त्याचा पत्ताही पोलीसांना लागला नाही. त्यावर खुद्द राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी बोट ठेवलं आहे. तटकरे, मुंडे नंतर आता तर खुद्द अजित पवार. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बोट ठेवल्यामुळे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी अडचण झाली आहे. या प्रकरणात चौकशी अंती बळी पोलीसांचा दिला जाईल पण गृहमंत्रालयाच्या राजकीय नेतृत्वावरही सवाल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com