राजकीय भूकंपाआधीची टिकटिक; अजित पवारांनी हटवला पक्ष चिन्हाचा फोटो
Admin

राजकीय भूकंपाआधीची टिकटिक; अजित पवारांनी हटवला पक्ष चिन्हाचा फोटो

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

यातच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन  राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. फेसबूक, ट्विटरवरुन अजित पवार यांनी पक्षाचे चिन्ह हटवलं आहे. यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.

Admin

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. यातच आता पक्ष चिन्हाचा फोटो हटवल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Admin

अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com