Ajit Pawar : शेतकरी कर्ज फेडणार कसे? दोघेच कारभारी म्हणत सरकारवर टीका

Ajit Pawar : शेतकरी कर्ज फेडणार कसे? दोघेच कारभारी म्हणत सरकारवर टीका

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या पूरग्रस्त गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आज ते गडचिरोली (Gadchiroli) आणि चंद्रपुरात नुकसानीची पाहणी करणार आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit pawar) हे सध्या पूरग्रस्त गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आज ते गडचिरोली (Gadchiroli) आणि चंद्रपुरात नुकसानीची पाहणी करणार आहे. यावेळी अजित पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि पूरामुळं झालेल्या नुकसानीची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून समजून घेतली. याठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्याची तक्रार इथल्या शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी अजित पवारांनी शिंदे सरकारवर (Shinde Govt) टीका केली, ते म्हणाले पूरग्रस्तांना काही मदत नाही, शेतकरी किती संकटात आहे. फक्त दोघांनी राज्य चालवणे शक्य नाही, हम दो आणि बाकी कुणी नाही असा सरकारचा कारभार आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी, असे आवाहनही अजितदादांनी केले.

Ajit Pawar : शेतकरी कर्ज फेडणार कसे? दोघेच कारभारी म्हणत सरकारवर टीका
Sanjay Raut : 'पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको'

पंचनामे झालेत का? असा थेट प्रश्न जेव्हा अजित पवारांनी शेतकऱ्यांना विचारला. त्यावर शेतकरी म्हणाले, मागच्या वर्षी पंचनामे झाले होते पण आत्ता झालेले नाहीत. कोणताही अधिकारी अद्याप आमच्याकडे आलेला नाही. आम्ही यासाठी भटवाड्याच्या कोतवालाकडे अर्ज दाखल केला आहे. तसचं तातडीची मदत देखील अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आर्थिक मदतीशिवाय सध्या आम्हाला काहीही नको.

Ajit Pawar : शेतकरी कर्ज फेडणार कसे? दोघेच कारभारी म्हणत सरकारवर टीका
आरे मेट्रो कारशेडचा वाद सुप्रीम कोर्टात, लवकरच सुनावणीची शक्यता

पूरामुळं जर धानचं राहिलेलं नाही तर आम्ही पिककर्ज भरायचं कसं? असा सवाल करताना शेतकरी म्हणाले, धानाच्या पिकावर आम्ही कर्ज घेतो, पण आता तेच राहिलेलं नाही. यासाठी आम्हाला एकरी साडेबारा हजार कर्ज मिळतं अशी माहितीही यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवारांना दिली. सरकारनं जर प्रयत्न करुन रोपं दिली तर त्याचा उपयोग होईल का? अशी विचारणा केल्यानंतर त्याचा आता उपयोग होणार नाही. कारण याचा सिझन आता दोन महिने पुढे गेला आहे. त्यामुळं याचाही उपयोग होणार नाही, असंही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com