मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी मृतअवस्थेत, आरोपी सफाई कर्मचारी...

मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी मृतअवस्थेत, आरोपी सफाई कर्मचारी...

मुंबईतील पवई येथे एअर होस्टेसची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता.
Published by :
shweta walge
Published on

मुंबईतील पवई येथे एअर होस्टेसची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इमारतीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे.

मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मृत एअर होस्टेस राहत होती. रुपल ओग्रे असं त्या तरुणीचं नाव होतं. राहत्या घरी मध्यरात्री तिचा मृतदेह सापडला. तरुणीची गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पवई पोलिसांना घटनास्थळी दाखल झाले. पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली. या हत्ये प्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

रुपल ओग्रे ही आपल्या बहिण आणि मित्रासोबत राहत होती, परंतु ते दोघे आठ दिवसांपूर्वी गावाला गेले होते. रुपल ओग्रे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली.

मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी मृतअवस्थेत, आरोपी सफाई कर्मचारी...
Chandrayaan 3 च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन

रुपल ओग्रेने तिच्या कुटुंबियांचे कॉल न उचलल्याने त्यांनी मुंबईतील एका मित्रांशी संपर्क साधलाआणि तरुणीची विचारणा करण्यास सांगितलं. जेव्हा तरुणीच्या कुटुंबियांचे मित्र तिथे गेले तेव्हा फ्लॅट आतून बंद दिसून आलं. त्यांनी बेल वाजवली असताना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी पवई पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर डुप्लिकेट चावीच्या मदतीने फ्लॅट उघडला. पोलीस आतमध्ये गेल्यानंतर या एअर हॉस्टेस गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल नेण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com