पुण्यात गणेशोत्सवासाठी अफजलखान वध देखाव्यास अखेर परवानगी, पोलिसांची देखाव्यास मंजूरी
Kothrud Police : पुण्याचे जिल्हाधिकारी या नात्याने आपण राज्य सरकार बरोबर संवाद साधून आम्हाला हा देखावा सादर करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे पत्रात नमूद करण्यात आले होते. तसेच आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही चाललो आहोत आंदोलनाची जागा देखील तुम्ही ठरवा असा मजकूर पत्रात नमूद केला होता. हे पत्र मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिले होते. याची दखल घेत पुण्यात गणेशोत्सवासाठी अफजलखान वध देखाव्यास अखेर परवानगी देण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांनी यासाठी मंजूरी दिली आहे. (Afzal Khan Vadh scene finally allowed for Ganeshotsav in Pune, Kothrud Police approved the scene)
पुण्यात कोथरूड भागात असणाऱ्या गणेशोत्सव मंडळास "अफजल खानाचा वध' या विषयावरील जिवंत देखावा दाखवण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यामुळे ही विनंती करण्यात आली होती.
आगामी गणेशोत्सवात "अफजल खान वध" सादर करण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे पुण्यातील गणेश मंडळ आंदोलन करणार होते. हे आंदोलन २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार होते.
पुण्याचे जिल्हाधिकारी या नात्याने आपण राज्य सरकार बरोबर संवाद साधून आम्हाला हा देखावा सादर करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे पत्रात नमूद करण्यात आले होते. लोकशाही मार्गाने आम्ही चाललो आहोत आंदोलनाची जागा देखील तुम्ही ठरवा असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला होता.