ताज्या बातम्या
वेदांता फॉक्सकॉननंतर आता कोकणातला रिफानरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार?
‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजून एक माहिती समोर येत आहे.
‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजून एक माहिती समोर येत आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर आता कोकणातला रिफानरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच कोकणातील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पही आता राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे.
हा रिफायनरी प्रकल्पाला गेल्या तीन वर्षांपासून हवे तसे सहकार्य मिळाले नसल्याने कंपनीने प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा प्रकल्प राज्यात झाल्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.