ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये अज्ञातांनी भाजपाचे बॅनर्स फाडले
दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.
हा दसरा मेळावा पार पडल्यानंतर दादर परिसरात भाजपाचे पोस्टर्स फाडण्यात आले. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा संपल्यानंतर पोस्टर फाडण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्याप ते पोस्टर कुणी फाडली ही माहीती मिळाली नाही आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.