आनंदवार्ता : स्कायमेटनंतर हवामान विभागाचाही सरासरी पावसाचा अंदाज

Published on

शेतकऱ्यांसाठी आनंददायी वार्ता आहे. यंदाही देशात जून महिन्यात मान्सूनचं (Monsoon) आगमन होणार आहे. यंदा ९९ टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कालच स्कायमेटने सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच यावर्षी आपल्याकडे मान्सून 'सामान्य' राहण्याची शक्यता आहे.या वर्षीच्या पावसाच्या (Rain) बाबतीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. या वर्षी सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे. राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकरी हवामान विभागाचा अहवाल पाहून शेतीच्या मशागतीची तयारी करत असतात.

भारतातील बहुतांशी शेती मान्सूनच्या अंदाजावर अवलंबून असतात. आता, भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग (Weather Forecasting) आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन (Agriculture Risk Solution) कंपनी असलेल्या स्कायमेटनं (Skymet) 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के (+/- 5 टक्के इरर मार्जिनसह) पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जो एलपीएच्या 98 टक्के इतका असेल. यापुर्वी स्कायमेटनं 21 फेब्रुवारी 2022 रोजी यावर्षीचा सर्वात पहिला मान्सून फॉरकास्ट जाहीर केला होता. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं यावर्षी मान्सून सामान्य असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी एकूण 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.

या वर्षीच्या पावसाच्या (Rain) बाबतीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. या वर्षी सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे. राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकरी हवामान विभागाचा अहवाल पाहून शेतीच्या मशागतीची तयारी करत असतात.

आनंदवार्ता : स्कायमेटनंतर हवामान विभागाचाही सरासरी पावसाचा अंदाज
रणबीर-आलिया अखेर लग्नबंधनात अडकले; अलिशान लग्न सोळ्याचे खास PHOTO

भारतातील बहुतांशी शेती मान्सूनच्या अंदाजावर अवलंबून असतात. आता, भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग (Weather Forecasting) आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन (Agriculture Risk Solution) कंपनी असलेल्या स्कायमेटनं (Skymet) 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के (+/- 5 टक्के इरर मार्जिनसह) पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जो एलपीएच्या 98 टक्के इतका असेल. यापुर्वी स्कायमेटनं 21 फेब्रुवारी 2022 रोजी यावर्षीचा सर्वात पहिला मान्सून फॉरकास्ट जाहीर केला होता. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं यावर्षी मान्सून सामान्य असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी एकूण 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com