सेना-मनसे संघर्ष : राऊतांनी राज ठाकरेंना ओवेसी म्हटल्यावर मनसेने दिले मोठे आव्हान
मुंबई
शिवसेना आणि मनसे संघर्ष आता तीव्र होऊ लागला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांना महाराष्ट्रातील ओवेसी म्हटले. यानंतर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. त्यांनी संजय राऊत यांना आव्हान देणारे पोस्टर सामना कार्यलयाच्या बाहेर लावले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले होते की, संजय राऊत महाराष्ट्रातील ओवेसी आहेत. ओवेसी यांनी जे काम उत्तर प्रदेशात केले, ते काम राज ठाकरे महाराष्ट्रात करत आहेत. राऊत यांच्या या वक्यव्यानंतर मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी शनिवारी दैनिक 'सामना'च्या कार्यालयाबाहेर बॅनर्स झळकावले. या बॅनर्सच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) यांना थेट इशारा देण्यात आला आहे. त्यात काही वर्षांपूर्वी संतप्त मनसैनिकांनी संजय राऊत यांनी गाडी पलटी केली होती. तेच छायाचित्र या बॅनरवर लावण्यात आले आहे.
काय लिहिले बॅनरवर
तुम्ही ओवेसी कोणाला बोलता, संजय राऊत तुमचा कर्कश भोंगा बंद करा. याचा त्रास तर संपूर्ण महाराष्ट्राला होतोय, नाही तर मनसे स्टाईल तुमचा भोंगा आम्ही बंद करू, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिक या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, ते पाहावे लागेल.