ठाण्यातील दुर्दैवी घटनेवर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या सगळ्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, गेले काही महिन्यापासून महापालिकेच्या दवाखान्यात देखील औषध खरेदीचे प्रश्न आले आहेत. कारण त्या ठिकाणी औषधं नसतात. राज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये परिस्थिती बिकट आहे. आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र असेल एकंदरीत कारभार हा कोलमडलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जयंत पाटलांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर आदित्य ठाकरे म्हणाले की,
जिथे जिथे कोणी भाजपच्या वाशिंग सेंटरमध्ये गेले नाही. त्यांना नोटीस येतात. त्यामुळे ते नेते भाजपसोबत जातात. हे आता जग जाहीर आहे. देशात नाही जगात कोणालाही विचारलं तर सर्वांना माहिती आहे. सगळे भ्रष्ट लोक एका बाजूला सत्तेत बसलेले आहेत. जे येत नाही त्यांना नोटीस पाठवतात, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.