गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप,म्हणाले 'मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले...'

गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप,म्हणाले 'मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले...'

डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
shweta walge
Published on

डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर आणि सहकार्यावर गुन्हे दाखल केले आहेत. लोकांसाठी आम्ही लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच दोन्ही पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे डिलाईरोडचा पुल बंद ठेवण्यात आला होता. मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाहीत. वेळेत काम पूर्ण न केलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भ्रष्टाचार आम्ही समोर आणले. पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आम्ही समोर आणल्यानंतरही 22 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट घातला. मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले आहेत त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालावे.

नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार असून सुरु केली नव्हती. सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवाळीचा बोनसचा प्रश्न उपस्थित केल्यावर बोनस दिला गेला. मुख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी राज्यपालांना पत्राद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रस्ते ब्लॉक केले जातात. एकीकडे भाजप सांगतं व्हीआयपी कल्चर नको आणि दुसरीकडे रस्ते बंद करतात. आम्हाला जर म्हणत असतील की आम्ही पूल सुरू केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मग समृद्धी महामार्ग उद्घाटन केलं त्यानंतर जे अपघात झाले, लोकांचा मृत्यू झाला मग आता गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून लोअर परळ पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर मात्र पालिकेने उर्वरित काम पूर्ण करण्याचा वेग वाढवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर रित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाईल रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले आणि या विरोधात गुन्हा दाखल झाली. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेचे रोड डिपार्टमेंट कडून तक्रार दाखल करून इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यासंबंधी आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com