ठाकरे Vs शिंदे! अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात दोन नेते आमने-सामने
गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान आदित्य ठाकरे सत्तार यांच्या सिल्लोड शहरात सभा घेणार आहेत. तसेच सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या दिवशीच सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे नियोजन केलं. सिल्लोड शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळेत श्रीकांत शिंदे यांची सभा, तर आदित्य ठाकरे यांचा संवाद मेळावा होणार आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे. मुळे आज सिल्लोड शहरात छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट सतत एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळतात. मात्र पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. सिल्लोड शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळेत श्रीकांत शिंदे यांची सभा, तर आदित्य ठाकरे यांचा संवाद मेळावा होणार आहे.
सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं सुरु होणार आहेत. या दोन्ही युवा नेत्यांची एकमेकांविरोधात तोफ धडाडणार आहे. दोन्ही नेत्यांच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याकडून यानिमित्ताने पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केली जाण्याची शक्यता आहे.