शिर्डीत 'मशाल' पेटवून आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा, म्हणाले, अबकी बार भाजप तडीपार..."
Aditya Thackeray On BJP : अबकी बार ४०० पार नाही, ४०० च्या पुढे तडीपारच लागणार. देशभरात सर्व ठिकाणी हेच वातावरण दिसत आहे. साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ, अशी भाजपची अवस्था झाली आहे. ही स्थिती भाजपने स्वत:हून त्यांच्यावर ओढवून घेतली आहे. २०१४ ते २०२४ पर्यंत डोळे झाकून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्याआधीची २५ वर्षांची भाजपा वेगळी होती. आणि २०१४ नंतरची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे. ज्यांनी दिली त्यांची साथ, त्यांचाच केला घात, अशी भूमिका त्यांची राहिली आहे. ४०० पारचे भाजपचे नारे होत आहेत. पण तुम्हाला असं वाटत असेल, माझ्या एका मताने काय होणार आहे. पण तुमच्या एका मताने देशाचं चित्र बदलणार आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते शिर्डी येथे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
आदित्य ठाकरे जनतेला संबोधीत करताना म्हणाले, देशभरात चित्र बदलत चाललं आहे. दक्षिण भारतात एकंही राज्य असं नाही जिथे ते भाजपला सांगतात, अबकी बार भाजप तडीपार. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये लोक सांगतात आता आम्ही भाजपचा अत्याचार सहन करू शकत नाही. आता आम्हाला भाजप सरकार नको. उत्तर भारत, मध्य भारतातही असचं चित्र आहे. बिहार राज्य फार महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्या वयाचे तेजस्वी यादव मोठी लढाई लढत आहेत. इथे जशी गद्दारी झाली, तसंच तिथे नितेश कुमार यांना पलटी मारावी लागली आणि भाजपात जावं लागलं. गेल्या दहा वर्षात अनेकदा भाजपला तिकडच्या लोकांनी मतदान केलं. हजारो कोटींचा पॅकेज देऊ, असं भाजपने सांगितलं होतं.
पण एक रुपयाही बिहारला मिळाला नाही. जो बदल घडणार आहे, त्यात बिहार राज्य महत्त्वाचं ठरणार आहे. तेजस्वी यादव बदल घडवतील, अशी मला खात्री आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल १५ वर्ष चांगलं सरकार चालवत आहेत. दिल्लीत प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे, अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे. संजय सिंग किंवा अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपने अनेकदा प्रयत्न केला होता. संजय सिंग यांना दोन-तीन महिन्यांपूर्वी अटक केली. आता त्यांना तीन महिन्यांनंतर सोडलं. आता राजधानीचे मुख्यमंत्र्यांना अटक करुन टाकलं. त्यांच्यावर कोणता आरोप आहे का, जो कुणी सत्यमेव जयतेवर विश्वास ठेवतो त्याला तुरुंगात टाकतात. तुम्ही भाजपला मतदान केलं तर त्यांची हुकूमशाही घराघरात पोहचेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.