Aditya Thackeray
Aditya Thackerayteam lokshahi

अयोद्ध्येत उभारणार 'महाराष्ट्र सदन' - आदित्य ठाकरे

अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथं एक महाराष्ट्र सदन (Maharashtra House) उभारण्यात येणार.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथं एक महाराष्ट्र सदन (Maharashtra House) उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे. पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे उपस्थित होते.

मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, युवासेना नेते वरुण सरदेसाई, दीपाली सय्यद उपस्थित आहेत. आज भक्तीभावाने रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलंय, की इकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे. पत्रव्यवहार करणार आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. 100-200 खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत.

आज आमची तिर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लांचं दर्शन घेतलंय. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. योगी सरकारशी पत्रव्यवहार देखील करणार आहेत", अशी महत्त्वपूर्ण माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे योगींशी पत्रव्यवहार करणार

"साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्ती जमेल असं प्रशस्त खोल्याचं 'महाराष्ट्र सदन' बनवायचं आहे. त्यांना राहण्यासाठी इथे चांगली जागा निर्माण करायची आहे. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत. तसेच त्यासाठी पत्रव्यवहार देखील करणार आहोत", असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com