आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; झेड सुरक्षा असूनही खासगी गाड्या ताफ्यात
आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिलेत. पण त्यांना गाड्या दिलेल्या नाहीत. तर या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्या सुरक्षेसाठी किती सुरक्षारक्षक द्यायचे, त्यांना गाड्या द्यायच्या की नाही. हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरोश्यावर हा दौरा करतोय. असे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे दुपारी 12.40 च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, तशा पद्धतीचं सुरक्षा कवच दिसलं नाही. त्यांच्या ताफ्यात खासगी गाड्या असल्याचं दिसून आलं.
वेदांता-फॉक्सकॉनप्रमाणे हा प्रकल्प बाहेर जाऊ नये, म्हणून शिवसेनेनी या प्रकल्पाला समर्थन करावे अशी मांडणार भूमिका आहेत. रिफायनरी समर्थकांसोबतच विरोधकही आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी दौऱ्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची धोपेश्व्रर रिफायनरी समर्थक मोठ्या संख्येनी भेट घेणार आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे पत्र राजापूरमधील शिवसैनिकच देणार आहेत.