Aaditya Thackeray ; राज्यातील गुन्ह्यांची कुंडली मांडत आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका

Aaditya Thackeray ; राज्यातील गुन्ह्यांची कुंडली मांडत आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत. यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. यावरच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गंभीर गुन्ह्यांची कुंडलीच मांडत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 2 वर्षांत, बनावट व्हॉट्सॲप संदेशांवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत अक्षम आणि निर्लज्ज बेकायदेशीर सीएमच्या अधिपत्याखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? अशी विचारणा केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,

1) काल रात्री एका भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात मिंधे टोळीच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या.

2) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंधे टोळीच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. बॅलिस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या वागणुकीचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

3) मिंधे टोळीचा आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलगा नंतर होर्डिंगवर दिसला आणि घटना, पोलिस कारवाई नाही.

4) मिंधे टोळीच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर इतरांची भाजपकडून शिकार केली जात होती. स्थानिक भाजप नेत्याने (2022 पर्यंत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते) कार्यकर्त्याला भेट दिली पण पोलीस कारवाई झाली नाही.

5) कुटुंब खंडणीच्या मागण्या मान्य करत नसल्याने मिंधे टोळीचा एक नेता त्याचा मुलगा एका कुटुंबाला आणि मुलीला त्यांच्या घरात मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला. कारवाई नाही.

6) ठाण्यातील मिंधे टोळीच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, कॅमेऱ्यात कैद.

Aaditya Thackeray ; राज्यातील गुन्ह्यांची कुंडली मांडत आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका
''मै बडा की तू' हे दाखवण्यासाठी शिंदे आणि फडणवीस...' उल्हासनगरमधील घटनेवर सुषमा अंधारे म्हणाल्या...

दरम्यान, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा परिणाम राज्यातील महायुती सरकारवरही झाला आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत. यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com