आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; नितेश राणे यांची मागणी

आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; नितेश राणे यांची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत धक्कादायक माहिती दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत धक्कादायक माहिती दिली आहे. राहुळ शेवाळे यांनी सांगितले की, सुशांत आणि दिशा सालियान यांच्या फोनमध्ये काय बोलणं झालं होतं? तिचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून का घेतला? रिया चक्रवर्तीचा मोबाईल तपासला का, तिच्या मोबाईलमध्ये AU हा नंबर सेव्ह होता. त्यावर 44 फोन आले होते, AU ला अनन्या उद्धव असं सांगितलं आहे.

पण बिहार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आदित्य आणि उद्धव ठाकरे असं नाव समोर आलं होतं. तसेच मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा कारवाई करते तेव्हा हायप्रोफाईल प्रकरणातच हस्तक्षेप करत असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी 3 स्तरावर चौकशी झाली होती. सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनी चौकशी केली होती. पण, यामध्ये अजूनही काही प्रश्न आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला आहे? असे विचारले.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, AU नावाचा व्यक्ती आदित्य ठाकरेच आहे. बिहार पोलिसांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच नावं घेतलं होतं. खरंच आत्महत्या होती तर या गोष्टी का लपवल्या असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेत त्यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com