Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र; पत्रात काय?
आदित्य ठाकरे यांचे मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे. आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये "पहिल्या प्रयत्नात पदवी" उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे.
या कारणास्तव महाराष्ट्रातील २ ते ३ लाख मुला- मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण कृपया या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी. या अटीत बदल करावा.
जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, ही विनंती. आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करत आहे. धन्यवाद ! असे आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे.