'मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेयं' आदित्य ठाकरेंचा आरोप

'मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेयं' आदित्य ठाकरेंचा आरोप

पालिकेची कॉफर्ड मार्केटमधील शिवाजी महाराज मंडई, वरळीतील अस्फाल्ट प्लांट व मलबार हिलमधील पॉवर स्टेशनची जागा लिलावात काढली जातंय. आम्ही पालिकेत असताना ९२ हजार कोटींच्या मुदतठेवी वाढवल्या.
Published on

मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातं असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पालिकेची कॉफर्ड मार्केटमधील शिवाजी महाराज मंडई, वरळीतील अस्फाल्ट प्लांट व मलबार हिलमधील पॉवर स्टेशनची जागा लिलावात काढली जातंय. आम्ही पालिकेत असताना ९२ हजार कोटींच्या मुदतठेवी वाढवल्या. परंतु आता पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. पालिकेच्या जागांचा लिलाव सुरू केलाय.भाजपवाले व शिंदे हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. पालिका विकण्याचे काम सुरूय. लिलावाचा अधिकार कुणी दिला कुणी? असा प्रश्न विचारला आहे.

आचारसंहितेत कुणाला काय परवानगी आहे ते निवडणूक आयोगाने सांगावे. अनेक ठिकाणी पोस्टर आहेत. रेल्वेत जाहीराती सुरू आहेत. माझा लढा हा महाराष्ट्राची लूट करणा-यांविरोधात आहे.

त्यांना मेन्टल कॉऊन्सिंगची गरज आहे.मी अभ्यासू व्यक्तींवर बोलतो. मॉब लिचिंग हे भाजपवाले करतात. राज्याचे भाजपकरण चाललंय. अदानीवर बोलताना भाजप कशाला त्यांना डिपेंड करायला येत आहे.मुंबई आम्हाला मिळवावी लागली आहे,ती फुकटात अदानीला जातंय. भाजप हरते तेव्हा जाती जातीत,धर्मा धर्मात भांडणे लावते. जागावाटप पेक्षा जमीनवाटप चालली आहे ते महत्वाचे आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com