ताज्या बातम्या
Adtiya L1 Mission : आदित्य एल-1 मोहिमेने पृथ्वीभोवती चौथी प्रदक्षिणा पूर्ण
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेले आदित्य एल-1 ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेले आदित्य एल-1 ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. आदित्य एल-1 अंतराळयान हळूहळू सूर्याकडे जात आहे. आदित्य एल-1 मोहिमेने पृथ्वीभोवती चौथी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संस्था 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' (ISRO) ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. आदित्य L-1 अंतराळयानाचे पहिले, दुसरे आणि तिसरे र्थ बाउंड मॅन्युव्हर 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाले.
आदित्य L-1 बरोबर अनेक प्रकारची उपकरणे पाठवण्यात आली असून ती सूर्याचा अभ्यास करणार आहेत. इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून या उपग्रहाचा अंदाज घेण्यात आला.