Aditya L-1 Mission : आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार

Aditya L-1 Mission : आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भारताची ही पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित केलं जाणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे.

भारताचे पहिले सौर सूर्य मिशन ‘आदित्य एल1’चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आदित्य एल 1 हे 125 दिवस प्रवास करणार असून त्या 15 लाख किलोमिटरचे अंतर पार करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com