Actor Govinda : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर; स्वत:च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने जखमी

Actor Govinda : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर; स्वत:च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने जखमी

अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची घटना घडली आहे. स्वत:च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाले असून क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.

स्वतःकडील बंदुक साफ करत असताना चुकून स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती मिळत आहे. याच गोविंदा जखमी झाले आहेत. गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राहत्या घरात स्वतःची बंदूक साफ करत असताना त्यांच्याकडून मिसफायर झालं आणि बंदुकीची गोळी त्यांच्या पायात घुसल्याची माहिती मिळत असून पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळी पाच वाजता ही घटना असून अंधेरी येथील क्रिटी केअर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com