हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी 40 लाख रुपयांची रक्कम जप्त

हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी 40 लाख रुपयांची रक्कम जप्त

हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गजानन वाणी, हिंगोली

हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक कोटी 40 लाख रुपयांची रक्कम पकडली आहे. हिंगोलीत दोन चार चाकी वाहनांमधून जाणारी जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे.

शहरातील बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून आचारसंहिता सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांमधून ही रोकड कुठून आली व कुठे चालली होती, याबद्दल पोलीस व निवडणूक विभाग चौकशी करत आहे.

दरम्यान ही सर्व कॅश पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आली असून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com