चंद्रशेखर भांगे, पुणे
पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंज वर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे.
या छाप्यात तब्बल 3 हजार 788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वाय फाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे.
दहशतवाद विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु असल्याची माहिती मिळत आहे.