ताज्या बातम्या
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. याच पार्श्वभूमीवर आता घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घाटकोपर होर्डिंगचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट जारी करणारे बीएमसीचे मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल कन्सल्टंट मनोज संघू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) संघूला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले आणि आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली आहे. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.