RTE Admission : आरटीईनुसार 23 तारखेपासुन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
आरटीईनुसार मंगळवारपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. 4 हजार 735 विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झालेली आहे. 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी शनिवारी प्रसिद्ध झाली आहे. या सोडतीनुसार मुंबई शहर आणि उपनगरातील 338 पात्र शाळांमध्ये एकूण 9 हजार 894 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 हजार 735 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
मंगळवारपासून या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारी संदेश येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर हे अॅडमिशन केले जाणार आहे. आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जात आहे.
त्यानुसार, मुंबईतील 338 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 आरटीईअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी काल 20 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आरटीईनुसार आरक्षित जागांसाठी 23 जुलैपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू, 4 हजार 735 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.