राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं

राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं

हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश
Published on

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज सकाळी एक मोठा अपघात झाला आहे. हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.

राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं
आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून पिपाण्या वाजवून चालत नाही; राऊतांचा शिंदेंना टोला

माहितीनुसार, सराव करण्यासाठी दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. नंतर जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. या अपघातात 2 पायलट जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाले याचा तपास करणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. मुरेना येथील कोलारसजवळ हवाई दलाच्या सुखोई-३० आणि मिराज-२००० विमानांच्या अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाला जलद बचाव आणि मदत कार्यात हवाई दलाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानांचे पायलट सुरक्षित असावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी यूपीमधील आग्रा येथून उड्डाण करणारे चार्टर् विमान राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उछैन भागात कोसळले होते. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com