Video रामनवमी उत्सावाला गालबोट : वसतीगृहात मासांहारी जेवण दिल्यावरुन हाणामारी

Video रामनवमी उत्सावाला गालबोट : वसतीगृहात मासांहारी जेवण दिल्यावरुन हाणामारी

Published by :
Team Lokshahi
Published on

देशभरात रामनवमी (RamNavami)उत्साहात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनंतर साजऱ्या होणाऱ्या राम नवमीनिमित्त देशभरात मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. परंतु या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमध्ये (gujrat)रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं, साबरकांठा आणि आणंद येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी मोठा राडा झाला.

दिल्लीच्या जेएनयूमध्ये (jnu)मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. त्यात विद्यार्थी जखमी झाले. अभविपच्या (ABVP) सदस्यांनी रामनवमीच्या दिवशी पूजेला परवानगी न दिल्याचा आरोप डाव्या गटावर केला आहे. त्यानंतर जेवणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू केला. विद्यापीठाच्या कावेरी हॉस्टेलमध्ये रामनवमी आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच इफ्तार पार्टीत मांसाहारही ठेवण्यात आला होता. यावरून डावे आणि अभविप यांच्यांत वाद सुरू झाला. अभविपच्या गटाने सांगितले की, पूजेच्या दिवशी मांसाहार मेनूमध्ये ठेवू नये. त्यावरुन दोन गटांत झालेल्या चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचले. दिल्लीचे डीसीपी मनोज सी. म्हणाले की, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता पोलिस दोषींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी JNUSU, SFI, DSF आणि AISA च्या विद्यार्थ्यांनी ABVP च्या काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ज्या अंतर्गत आयपीसी कलम 323/341/509/34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

गुजरातमध्ये गालबोट

गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं. गुजरातमधील साबरकांठा आणि आणंद येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यावेळी पोलिसांच्या गाडीला देखील आग लावण्यात आली. सारकांठा व आणंद येथे रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. त्याच वेळी शोभायात्रेवर दगडफेक सुरु झाली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या जमावाने दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com