Shree Ram Navmi 2024: रामनवमीला रामलल्लावर सूर्यतिलक

Shree Ram Navmi 2024: रामनवमीला रामलल्लावर सूर्यतिलक

आज राम नवमीच्या दिवशी दुपारी 5 मिनिटांसाठी सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आज राम नवमीच्या दिवशी दुपारी 5 मिनिटांसाठी सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला. CSIR-CBRI रुडकीचे वैज्ञानिक डॉ. एस. के. पाणिग्रही यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत यामागचं विज्ञान सांगितलं आहे. यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सचा वापर करण्यात आला.

या ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टीममध्ये हे आरसे आणि लेन्स एका पाईपिंग सिस्टीममध्ये फिट करण्यात येतात. यामुळे तिसऱ्या मजल्यावर पडणारी सूर्याची किरणे ही गर्भगृहाच्या दिशेने वळवणं शक्य होतं. आरशांच्या मदतीने सूर्यकिरणे गर्भगृहापर्यंत पोहोचवल्यानंतर शेवटी लेन्सच्या मदतीने सूर्यप्रकाश रामलल्लांच्या कपाळावर केंद्रित होतात या माध्यमातून रामलल्लाच्या कपाळी सूर्य-तिलक लावला गेला.

चालू आठवड्यात भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन 19 एप्रिलपर्यंत बंद ठेवणअयात येणार आहे. राम नवमीनंतर आणखी पुढील दोन दिवस सुगम दर्शन पास, व्हिआयपी दर्शन पास, मंगल आरती पास, बांगर आरती पास आणि शयन आरती पास जारी केले जाणार नाहीत, असे ट्रस्टने जाहीर केले आहे. श्री राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अयोध्या महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास 80 ते 100 ठिकाणी एलईडी दिव्यांद्वारे केले जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com