गुजरातमध्ये अबकी बार 150 पार; गुजरातमध्ये भाजपाची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल
गुजरात निवडणुकीचा निकाल 2022 चा आज निकाल लागत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. गुजरातमधील सुरुवातीच्या कलानुसार भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे.भाजपने प्रचंड विजय मिळवला आहे.सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.
गुजरातमध्ये 'आप' 10 जागांवर आघाडीवर असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, गुजरातमध्ये 'आप'ला 13 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसला आतापर्यंत 26.5 टक्के मतं मिळाली आहेत.
भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच सर्व जागा लढवणारा आम आदमी पक्षही 10 जागांवर आघाडीवर आहे, तर 4 जागांवर इतर पक्ष, अपक्ष आघाडीवर आहेत.