Aarey Metro Car Shed : आरेतील झाडांची कत्तल थांबणार? याचिकेवर आज सुनावणी
आरे मेट्रो कारशेडसाठी (Aarey Metro Car Shed) अतिरिक्त झाडे तोडीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यतेखाली होणार आहे. दरम्यान, आरेमध्ये काल रात्री मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी जमा झाले होते. आरे कार शेड 3 जवळ मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आरेतील कामावरील स्थगिती उठविली. स्थगिती उठविल्याबरोबर ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (एमएमआरसी) सोमवारी सकाळी आरेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करून झाडांची छाटणी सुरू केली. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात नाकाबंदी करण्यात आली होती. याचपार्श्वभूमीवर मुंबईतल्या मेट्रो-तीन मार्गाच्या कारशेडच्या आरेमधल्या बांधकामाविरोधात वनशक्ती संस्थेकडून दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण ऐकून याचिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला.