औरंगजेबाच्या 'जजिया' कराची आठवण करुन देतोय GST; 'आम आदमी'ची केंद्रावर टीका

औरंगजेबाच्या 'जजिया' कराची आठवण करुन देतोय GST; 'आम आदमी'ची केंद्रावर टीका

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही मंगळवारी केंद्र सरकारवर जीएसटी लागू केल्याबद्दल टीका केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आज जीएसटीवरुन केंद्रावर निशाणा साधला. दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील धर्मशाळांवर लावला जाणारा १२ टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. हा कर मुघल काळातील 'जझिया' कराची आठवण करून देतो अशा शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलेल्या निवेदनात पंजाबचे राज्यसभा सदस्य चड्ढा म्हणाले की, सरायांवर/ धर्मशाळांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लादल्यानं देशाच्या विविध भागांतून सुवर्ण मंदिरात येणाऱ्या भक्तांचा खर्च वाढणार आहे. चढ्ढा म्हणाले की, सुवर्ण मंदिर हे प्रार्थनेसाठी सर्वांसाठी खुलं आहे. जगभरातून सुमारे एक लाख भाविक दररोज इथे भेट देतात.

गुरु गोविंद सिंग एनआरआय निवास, बाबा दीप सिंग निवास, माता भाग कौर निवास यासारख्या धर्मशाळा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) भक्तांना आश्रय देण्यासाठी चालवल्या जातात. या धर्मशाळा नफा कमावण्यासाठी नाही तर सेवा म्हणून चालवल्या जातात. "पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळील धर्मशाळांवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबतचं निवेदन दिलं. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जीएसटी लागू केल्याबद्दल टीका केली.

औरंगजेबाच्या 'जजिया' कराची आठवण करुन देतोय GST; 'आम आदमी'ची केंद्रावर टीका
चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदराकडे करतंय कूच; भारताच्या डोक्याचा ताप वाढणार?

जीएसटी कौन्सिलचा निर्णय म्हणजे मनमानी

सुवर्ण मंदिराजवळील धर्मशाळेत राहणाऱ्या भाविकांना सरकार लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जीएसटी परिषदेच्या निर्णयाला मनमानी असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, गुरु गोविंद सिंग एनआरआय निवास, बाबा दीप सिंग निवास आणि माता भाग कौर निवास यासह अनेक धर्मशाळा सुवर्ण मंदिराशी संबंधित आहेत. या धर्मशाळा नेहमीच गुरुद्वारा संकुलाचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. चड्ढा यांनी धर्मशाळेवर 12 टक्के जीएसटी लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाला अनावश्यक आर्थिक लादल्याचं म्हटले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com