Aaditya Thackeray : केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं

Aaditya Thackeray : केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं

MPSC आणि IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

MPSC आणि IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. यावरुन आता विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, दोन्ही परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. राज्यातल्या राजवटीने विद्यार्थ्यांचा विचार करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी. मुळात वारंवार असं घडत असेल तर केंद्राशी योग्य संवाद आणि समन्वय हवा. विद्यार्थ्यांबाबत असंवेदनशील राहून चालणार नाही, हे ह्या राजवटीला समजायला हवं! असं आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com